ट्रकवर बस आदळून विद्यार्थिनींसह दहा प्रवासी जखमी

0

भुसावळ- ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागावून आलेली बस धडकून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थिनींसह प्रवासी मिळून दहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ झाला. भुसावळ-जुनोना ही बस (एम.एच.14 बी.टी.1659) जुनोना गावाकडे जात असताना पुढे जाणार्‍या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी बस थेट ट्रकवर जोरदार धडकली. यात सहा शालेय विद्यार्थिनींसह दहा जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात बसच्या दर्शनी काचस बंपरचे नुकसान झाले.