सतना : ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज सकाळी 5 वाजता सतना येथे घडली. एकाच कुटुंबातील 6 जण सकाळी पाच वाजता जवळच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी सतना ते सिमरियाचा एक वेगवान ट्रकने त्यांना धडक दिली. या झालेल्या अपघातात दोन मुलांसह दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना एका मुलाचा मृत्यू झाला. मृतामध्ये चूनी देवी (दादी) , रेणू 30 वर्षे (आई), शुभय 8 वर्ष (मुलगी), स्वराज 6 वर्ष (मुलगा) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.