यावल- ट्रक व्यावसायीकांचा गेल्या चार दिवसांपासून संप सुरू असल्याने यावल तालुक्यातील केळीची वाहतूक मंदावल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभरात हजारो ट्रकांची वर्दळ असते मात्र संपामुळे ती ठप्प झाली आहे. यावल शहरातील राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट दिसून येत आहे. चक्का जामचा फटका केळी मजुरांना बसला आहे. यावल शहर व परीसरात हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह केळी मजुरीवर आहे त्यामुळे केळी कामगार निष्प्रभ व हतबल झालेल आहेत. सरकारने व केळी व्यावसायीकांनी वाटाघाटी करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.