धुळ्यानजीक बाभळी फाट्यावरील घटना
धुळे – मुंबई-आग्रा महामार्गावर सात ते आठ दरोडेखोरांना ट्रक चालकास अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील आठ हजार रुपये लुटून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेत अय्यपन वीरा स्वामी (51, तामिळनाडू) या चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर ट्रक चालकाच्या साथीदाराने त्यास रुग्णालयात हलवले व नंतर पोलिसांना घटना सांगितली मात्र पोलिसांना मयताच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा न आढळल्याने एकूणच या घटनेविषयी संशय उपस्थित होत आहे. धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक् विवेक पानसरे या घटनेविषयी बारकाईने चौकशी करीत असून आताच याबाबत काही सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.