जळगाव। गुजराथ येथील भरुच येथून कापसाच्या गठाणी नागपूर येथे घेवून जाणार्या ट्रक क्रमांक सीजी 04 जेबी 1479 मधील 25 लाखांचा मुद्देमाल परस्पर लांबवून नेल्याप्रकरणी प्रकाश मंडलीक यांच्या फिर्यादीवरून सुरेश यादव, तस्लीम खान अयुब खान व फिरोज खान जाफर यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी तस्लीम खान याला अटक करून न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आणखी दोन जणांना घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चोरीप्रकरणी जाबीर खान साबीर खान रा. मास्टर कॉलनी व मोहसीन सैय्यद मुस्ताक रा. सुप्रिम कॉलनी अशा आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यातच या दोघांनी ट्रकचा विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली आहे. तर रविवारी ताब्यात घेतलेल्या ट्रकांमध्ये विल्हेवाट लावलेल्या ट्रकमधला माल त्या दोन ट्रकांमध्ये भरल्याचीही चोरट्यांनी पोलिसांना सांगितली.