जळगाव। मागील आठवड्यात झालेल्या ट्रकचोरी प्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींची पोलिस कोठडीची मुदत आज संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येवून त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे. पॉलिस्टर व सिन्थेटीकचे धागे बनविण्यासाठी लागणारा 25 लाखाचा कापसाच्या गाठी घेवून गुजरातमधून नागपूरकडे जाणारा ट्रक जळगावातून गायब करुन त्याची विल्हेवाट लावली होती.
अन्य.. दोघे अद्याप फरारच
गुजराथ येथील भरुच येथून कापसाच्या गठाणी नागपूर येथे घेवून जाणार्या ट्रक क्रमांक सीजी.04.जेबी.1479 मधील 25 लाखांचा मुद्देमाल परस्पर लांबवून नेल्याप्रकरणी प्रकाश मंडलीक यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी लागलीच ट्रकचालक तस्लीम खान, सैय्यद मौसीम सैय्यद मस्ताक, जाबीर शाबीर खान, यासीन खान मासूम खान या चौघांना अटक केली होती व त्यांची 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज मंगळवारी चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद केल्यानंतर न्या. गोरे यांनी दोघांची पक्षांची बाजू ऐकत चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. ए.एफ.तडवी यांनी कामकाज पाहिले.