ट्रक-मोटरसायकलचा अपघात; वृद्ध महिला जखमी

0

रावेर । कोलगेटने भरलेल्या ट्रकने कट मारण्याने मोटरसायकल स्वार व वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहीतीनुसार कोलगेटने भरलेला ट्रक क्र (आरजे 11 जीए 3199) हा रावेरकडे येत असतांना समोरुन जाणार्‍या मोटरसायकला कट मारले. यामुळे दोघे किरकोळ जखमी झाल्याने ट्रकला रावेर पोलिसात जमा करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.