जळगाव। महामार्गावर गौरव हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ट्रक व डंपरचा विचीत्र अपघात घडला यात 3 जण जखमी झाले. अपघातामुळे सुमारे तासभर वाहतुक खोळंबली होती. आशिया महामार्ग क्र. 46 वर खेडी फाट्याच्या अलीकडे हॉटेल जवळ वाळून ेभरलेले डंपर क्र. जीजे एव्ही 5523 वाळू घेऊन भुसावळकडे जात होते तर ट्रक क्र. सीजी 14 डी 0523 भुसावळहून जळगावकडे येत होता. डंपर बसच्या मागे होते. बसने अर्जंट ब्रेक दाबल्याने डंपर बाजुला होवून समोरून येणार्या ट्रकशी धडकले. ट्रकचे पुढील टायर फुटलले होते.
एमआयडीसी पोलिसात तक्रार
या अपघातात मो.आलम शहानबाज आलम (वय 19) व सुरेश खरारे (वय 27) या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे एक ते दिड तास वाहतुक खोळंबली. ट्रकची चाके जाम झाल्याने क्रेनव्दारे ट्रक रस्त्याच्या बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. याबाबत अब्दूल रहिम (रा.इदौर, झारखंड) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. खैरनार करत आहेत.