ट्रम्प सरकारच्या एकतर्फी मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत – इमरान खान

0

इस्लामाबाद : ट्रम्प सरकारच्या एकतर्फी आणि मनमानी पद्धतीच्या मागण्या पाकिस्तानात मान्य केल्या जाणार नाहीत,असं नवनिर्वाचित पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटलंय. अमेरिकन परदेश मंत्री पाइक पोम्पिओ यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी पाकिस्तानमधील मीडियानं हा दावा केलाय.

वृत्तानुसार शुक्रवारी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या एका पत्रकार परिषदेत इमरान खान यांनी, परस्पर सन्मानाच्या आधारावर अमेरिकेसोबत द्विपक्षीय संबंधांना चालना मिळण्याची आपल्या नीतीचा पुनरुच्चार केलाय.महत्त्वाचं म्हणजे, भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 सप्टेंबरपासून चर्चा सुरू होणार आहे. या बैठकीपूर्वी माइक पोम्पिओ 5 सप्टेंबर रोजी पाकिस्तान जाणार आहेत.

इमरान खान पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेलाही उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येतंय. दुसऱ्या कामात व्यस्त असल्यानं आपण या महासभेत अनुपस्थित राहणार असल्याचं इमरान यांनी म्हटलंय. त्यांच्याजागी परदेश मंत्री शाह महमूद कुरैशी 73 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्राला उपस्थित राहतील.