‘ट्रान्सपोर्टनगर’चे नामकरण बाळासाहेब ठाकरेनगर करा

0

कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील निगडीतील ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

वाहतूकदारांची सहमती
निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील ट्रान्सपोर्टनगर परिसराला व्यावसायिक दृष्टीने मोठे महत्व आहे. देशभरासह महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिकांची या नगरीत आवक-जावक चालू असते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाला ‘ट्रान्सपोर्टनगर’ म्हणून ओळखले जाते. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. बाळासाहेबांनी मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी माणसाला त्याच्या न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. देशभरातील वाहतूकदारांना बाळासाहेबांविषयी अतिशय प्रेम, आस्था आहे. ‘ट्रान्सपोर्टनगर’चे बाळासाहेब ठाकरे नगर असे नामकरण करण्याची मागणी वाहतूक व्यावसायिकांसह इतर नागरिकांची आहे. निवेदनाची प्रत ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांना दिली आहे.