प्रशासनाला निवेदन ; प्रथमच निघणार ऐतिहासीक मोर्चा
फैजपूर:- तीन तलाक विधायक लोकसभेत मंजूर केल्याने ते रद्द करण्याच्या मागणीसाठी फैजपूर शहरासह परीसरातील मुस्लिम महिलांचा2 एप्रिल रोजी फैजपूर प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात 15 हजारांच्या जवळपास महिला सहभागी होणार आहेत. लोकसभेत तीन तलाक विधेयक कायद्याला मंजुरी देण्यात आली.
भारतातील सर्वच इस्लाम धर्माला मानणार्या मुस्लिम समाजातील जागृत महिलांनी या विधेयकाला विरोध करून 2 एप्रिल रोजी फैजपूर शहरासह रावेर व यावल तालुक्यातील चिनावल, विवरा, वाघोदा खुर्द, मारुळ, न्हावी, बोरखेडा व पंचक्रोशीतील महिलांचा मूक मोर्चा फैजपूर प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार आहे.