जळगाव। विदगावकडून जळगावकडे विटा घेवून येत असतांना ट्रॅक्टरच्या ट्रॅालीवरून तोल जावून खाली पडल्याने युवकाचा मृत्यु झाला. बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विटा घेवून विदगावहून जळगावकडे येत असतांना चालकाने खड्डे वाचविण्यासाठी वाहन रस्त्याच्या खाली उतरवुन वर घेत असतांना ममुराबादच्या आसपास ज्ञानेश्वर राजु कुंभार (वय 18) रा.खालची अळी ,नशिराबाद याचा तोल जावून तो खाली पडला.त्याला पोटाला, छातीला व शरिराला दुखापत झाली.त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता सायंकाळी त्याची प्राणज्योत मावळली.
मयत ज्ञानेश्वर हा त्याचा घरातील करता होता. 12 वीच्या परिक्षेत 62 टक्के गुण घेवून तो उत्तीर्ण झाला होता. स्व कमाईने तो शिक्षण घेत होता. तसेच कुटुंबाला हातभार लावत होता.त्याच्या पश्चात आई-वडील , लहान भाऊ व बहिण असा परिवार आहे.त्याच्या कुटुंबातील सदस्य हातमजुरी करून उदर निर्वाह करतात.