ट्रॅक्टर चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

0

जळगाव । निमखेडी रस्त्यावरील हिराशिवा कॉलनीजवळ 14 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकाने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक केली होती. तो सध्या न्यायालायीन कोठडीत आहे. त्याने अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज बुधवारी फेटाळला आहे.

तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आव्हाणे मार्गे निमखेडी रस्त्यावरून ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांनी ट्रॅक्टर (क्र. एमएच-19-एपी-9407) अडवले होते. या वेळी ट्रॅक्टरचालक संजय राजेंद्र राठोड (वय 25, रा. निमखेडी) याने बाविस्कर यांच्याशी अरेरावी केली. त्यानंतर त्याने बाविस्कर यांच्या अंगावर घालून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी चालक राठोड याला अटक केली होती. त्याने न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज बुधवारी फेटाळला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.