ट्रॅन्टर कंपनीच्या कामगारांचे आंदोलन सुरूच

0

सणसवाडी : सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील डिंग्रजवाडी येथील ट्रॅन्टर इंडिया प्रा. लि. या कंपनीने कामगार संघटनेला कोणतीही सूचना न देता 17 कामगारांना 1 डिसेंबर रोजी अचानक कामावरून कमी केले. या कामगारांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कामगार संघटनेने कंपनी गेटवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला 26 दिवस झाले तरी कामगारांच्या प्रश्‍नांबाबत व्यवस्थापनाने कोणतीच चर्चा केलेली नाही.

याबाबत कामगारांनी कंपनीला जाब विचारला असता, कंपनीत काम कमी असल्याचे कारण पुढे करत 17 जणांना कामावरून कमी केल्याचे सांगण्यात आले. अचानक नोकरी गेल्याने कुटुंबाचा डोलारा सांभाळायचा कसा, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. या कामगारांनी आतापर्यंत विनातक्रार कंपनीत कामे केली आहेत. संबंधित कामगारांना नोटीस देण्यात आली नाही. सतत कंपनीचा विचार करत असताना अचानक कामगारांना कामवरून कमी केले आहे.