‘ठग्स’कडून प्रेक्षकांची निराशा, सोशल मीडियावर तीव्र नाराजी

0

मुंबई : ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ काल प्रदर्शित झाला. त्यामुळे प्रदर्शित झाल्याबरोबरच प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/Deepvalesha1/status/1060435225300201472

https://twitter.com/Atheist_Krishna/status/1060436306118037504

https://twitter.com/iameicky/status/1060385405143461890

आमिर खान, अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स’ विषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपटाचे पोस्टर, प्रमोशनचा हटके फंडा, गाणी, ट्रेलर या सर्वांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यास भाग पाडले. अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. मात्र चित्रपटाने चाहत्यांची निराशा केली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या चित्रपटाला अवघे दोन स्टार दिले आहेत. तसेच ‘प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते, असेही त्यांनी ट्विट केले आहे.