चिंबळी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र विकास केंद्राचे कॉनक्वेस्ट महाविद्यालय, चिखली यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर जि. प. प्रा. शाळा ठाकरवाडी (कडाचीवाडी) येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 200 लोकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
अत्यल्प दरात चष्मे वाटप तर शालेय विद्यार्थ्यांना मोफत पायमोजे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष अनिल पाटील, सरपंच शांताबाई ठाकर, उपसरपंच अशोक कड, सदस्य बाळासाहेब कड, नेहा बोकील, प्रा. प्रदीप कदम, कार्यक्रम अधिकारी दयानंद ओव्हाळ, शुभश्री हॉस्पिटल देहुरोडचे डॉ. धनंजय वाणी, डॉ किरण वाघमारे उपस्थित होते. या तपासणीमध्ये शारिरीक चाचण्या, वजन, उंची, इतर आजार, डोळे तपासणी, कमी दरात चश्मे वाटपही गरजूंना करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्याना पायमोजे वाटण्यात आले. प्रास्तविक प्राचार्य प्रदीप कदम यांनी, सूत्र संचालन प्रा. अनिता जाधव यांनी, तर आभार प्रा. नेहा बोकील यांनी मानले.