मुंबई : बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे.
अवघ्या दोन मिनिटांत या भूमिकेसाठी नवाजची निवड केल्याचं निर्माते संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी अवघ्या दोन मिनिटांत कास्टिंग झाले. एकदा प्रवासात मी ‘फ्रिकी अली’ हा चित्रपट पाहत होतो. नवाजुद्दीन त्यात गोल्फ खेळाडूची भूमिका साकारत होता. ‘ठाकरे’ चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्यापासूनच मला नवाजुद्दीनचा चेहरा बाळासाहेबांसारखा दिसू शकतो, हे मला जाणवलं.’ आणि नवाजला सिलेक्ट करण्यात आलं. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.