मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येणार आहे. या चरित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाबद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री अमृता राव बाळासाहेबांच्या पत्नीच्या म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांच्या मते, अमृताच्या चेहऱ्यावरील निरागस आणि निष्पाप भावामुळे ती या भूमिकेसाठी उत्तम आहे. मात्र, अमृताने अजूनही याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही.