मुंबई-शिवसेना प्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २३ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दरम्यान आज दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट काही दृश्य व संभाषणामुळे अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्य कट केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. जवळपास तीन दृश्य कट केल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या दृश्यांवर कात्री लावण्यात आली आहे त्यात, बाबरी मशीदचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या देशात राम मंदिरावरून वातावरण तापले असतांना त्यात बाबरी मशीदचा मुद्दा असल्याने वाद निर्माण होऊ नये म्हणून ते कट करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. नवाजुद्दिन सिद्धकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.