मुंबई: ठाकरे कुटुंबातील आजपर्यंत कोणताही व्यक्ती सक्रीय राजकारणात नव्हता. मात्र पहिल्यांदा युवसेना प्रमुख हे सक्रीय राजकारणात उतरले आहे. आज स्वत: आदित्य ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. वरळीतून ते निवडणूक लढविणार आहे. आज वरळी येथे शिवसेनेचा विजयी संकल्प मेळावा झाला, यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वत:च्या उमेदवाराची घोषणा केली.
जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.