ठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0

भंडारा: वाढीव वीजबिल आणि भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ भाजपने भंडारा येथे आंदोलन केले. यावेळी राज्यातील मोठे नेते सहभागी झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. ठाकरे सरकारची बिल्डरांवरची मर्जी अधिक आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. मात्र सरकारला जनतेच्या प्रश्नांशी घेणेदेणे नाही असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला.