ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

0

मुंबई: कोरोनाचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंत्री, आमदार, खासदारही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता पुन्हा एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कॉंग्रेस नेते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली आहे. स्वत: त्यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. ते घरीच उपचार घेत आहेत.

ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याने गडाख होम क्वॉरंटाइन झालेले आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही करोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोविड चाचणी केली असता त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी होम क्वॉरंटाइन होण्यास सांगण्यात आले