गरीब विद्यार्थ्यांना जिजाऊ प्रतिष्ठानचा मदतीचा हात

0

वासिंद : ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना 5 लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी हाती घेतला आहे. जिजाऊ प्रतिष्ठान या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातीत शहापूर, भिवंडी, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या परिसरातील तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, मोखाडा, तलासरी, जव्हार , डहाणू या भागातील ग्रामीण भागात आदिवासी वाड्या, वस्त्यांवर गावागावात एकूण 5 लाख वह्या व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना घेतले दत्तक
जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून 100 शेतकरी दत्तक घेऊन त्यांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. तसेच जिजाऊ स्पोर्टस अ‍ॅकेडमी सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खोखो, कबड्डी, मैदानी कुस्ती, मॅरेथॉन या खेळात प्राविण्य घडविण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. याकरिता जिजाऊ स्पोर्टसची स्थापना करण्यात आली आहे. असे विविध सामाजिक उपक्रम राबवून जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.