ठाण्यातील खुनानंतर भुसावळात रेल्वे गाड्यांची तपासणी

0

भुसावळ- ठाणे येथे एका जणाचा खून करून संशयीत बिहारमध्ये रेल्वेने भुसावळमार्गे पसार होत असल्याची माहिती ठाणे कंट्रोल रूममधून भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाल्यानंतर मंगळवारी पहाटे चार ते सात दरम्यान तीन रेल्वे गाड्यांची येथे तपासणी झाली मात्र संशयीत मिळून आले नाहीत. सहा.अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह लोहमार्गचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी, शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी डाऊन कलकत्ता, कुर्ला-राजेंद्रनगर एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेसची तपासणी आरोपी मात्र मिळून आले नाहीत. पहाटे चार ते सात वाजेपर्यंत गाड्यांची तपासणी करण्यात आली.