ठाण्यातील डॉक्टरच्या मुलीची आत्महत्या

0

मुंबई : ठाण्यातील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शर्मिष्ठा सोम असे या तरुणीचे नाव आहे.

ठाण्यामधील कोलशेत येथील एव्हरेस्ट इमारतीत सोम कुटुंब राहतं. आज सकाळी कावेरी सोम यांची मुलगी शर्मिष्ठा सोम यांनी एव्हरेस्ट इमारतीच्या १२ व्या मजल्याावरुन उडी मारुन आत्महत्या केली. शर्मिष्ठा या एबीबीएस असून तणावाखाली असल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान कल्याणमधील खडकपाडा या ठिकाणी एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकादा महिला डॉक्टरच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.