ठाण्यात तीन ट्रक-कारमध्ये अपघात

0

ठाणे । घोडबंदर रोडवरील वेदांग रुग्णालयाजवळ तीन ट्रक आणि एका कारमध्ये अपघात झाला. या घटनेनंतर चालक ट्रकमध्येच अडकून होता. काही वेळाने त्याला बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.