ठाणे । ठाण्यातील वसंत विहार भागातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामागील म्हाडाची जुनी इमारत कोसळली. यात जीवितहानी झाली नसून, आसपासच्या सर्व धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. वसंतविहार भागातील बुधवारी सकाळी म्हाडाची जुनी इमारत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.