ठाणे – ठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा ब्लास्ट झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.
सिंलिंडरचा ब्लास्टमध्ये कांतीबाई वानखेडे यांचा मृत्यू झाला आहे. संदीप काकडे, हिंमांशू काकडे, वंदना काकडे, लतिका काकडे हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंलिंडरचा ब्लास्ट झाल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.