लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये 60 लाख 94 हजार 308 मतदार आहेत. यामध्ये 33 लाख 21 हजार 758 पुरुष, तर 27 लाख 70 हजार 949 महिलांचा समावेश आहे. उर्वरित मतदारांमध्ये तृतीयपंथी 340, अनिवासी भारतीय 40, तर सशस्त्र दलातील 1221 मतदार आहेत. त्यापैकी सात लाख 69 हजार 552 मतदारांकडे ओळखपत्रे नाहीत. जिल्ह्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख 34 हजार 935 मतदार आहेत.
याप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्ये चार लाख 22 हजार 279, कल्याण पश्चिमला चार लाख 28 हजार 814, ओवळा-माजिवडा चार लाख 21 हजार 118, कल्याण ग्रामीण चार लाख तीन हजार 20, मुरबाड तीन लाख 78 हजार 530, बेलापूर तीन लाख 68 हजार 543, मुंब्रा-कळवा तीन लाख 28 हजार 450, अंबरनाथ तीन लाख दोन हजार 546, कल्याण पूर्व तीन लाख 33 हजार 971, डोंबिवली तीन लाख 38 हजार 217, कोपरी-पाचपाखाडी तीन लाख 42 हजार 793, ठाणे तीन लाख 18 हजार 67, भिवंडी दोन लाख 79 हजार 340, शहापूर दोन लाख 44 हजार 90, भिवंडी पश्चिम दोन लाख 64 हजार 678, भिवंडी पूर्व दोन लाख 63 हजार 67 तर उल्हासनगर विधानसभेत दोन लाख 21 हजार 850 मतदार आहेत. जिल्ह्यातील 340 तृतीयपंथींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. यापैकी सर्वाधिक 81 तृतीयपंथींची नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिमला 70, कल्याण ग्रामीण 55, तर ऐरोलीला 25 तृतीयपंथी मतदारनोंदणी करण्यात आली आहे.
सर्वाधिक दोन लाख एक हजार 781 महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. मीरा-भाईंदरला एक लाख 96 हजार 684, ओवळा-माजिवडा मतदारसंघात एक लाख 91 हजार 577, ऐरोलीत एक लाख 85 हजार 841 महिला मतदार आहेत. सर्वात कमी महिला मतदार 99 हजार 682 उल्हासनगर येथे आहेत.