जळगाव- शहरातील अयोध्या नगर भागातील एका विद्युत खांबाला भरधाव डंपरने धडक दिल्याची घडना उघडकीस आली़ याबाबत महावितरणच्या अधिकाजयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरूध्द तक्रार दाखल केली आहे़ 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3़30 वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने अयोध्यानगर भागातील एका विद्युत खांबाला जोरदार धडक दिली़ यात विद्युत खांब वाकला जाऊन तारा तुटल्या़ दरम्यान, नागरिक घटनास्थळी पोहचणार तोच डंपरसह चालकाने त्या ठिकाणाहून पोबारा केला़ या अपघातामुळे त्या परिसरातील विज पुरवठा खंडित झाला होता़ याबाबत रहिवाश्यांनी त्वरीत महावितरणच्या कर्मचाजयांना घटना कळवताच कर्मचारी त्या ठिकाणी धाव घेतली़ यानंतर तुटलेल्या विद्युत तारा बदलविण्यात आल्या़ यानंतर महावितरणचे सुरेश पांचगे यांनी डंपर चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़