डांगे चौक, काळेवाडी फाटा ग्रेडसेपरेटरची निविदा रद्द करा 

0
अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा तुषार कामठे यांचा आरोप
पिंपरी चिंचवड : महापालिकेतील विविध विकास कामांसाठी ठेकेदाराकडून जादा दराने निविदा भरल्या जात आहेत. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे. स्थापत्य विभागामार्फत डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने दरापेक्षा ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत. ज्यादा दराने आलेल्या या निविदांमुळे कोट्यावधी रुपयांचा आर्थिक ‘भुर्दंड’ महापालिकेला सोसावा लागणार आहे. तरी अशा प्रकारच्या जादा दराच्या निविदा रद्द करून त्या कामांच्या फेरनिविदा काढाव्यात, अशी मागणी कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कोट्यावधी रुपयांचा आर्थिक ‘भुर्दंड’
स्थापत्य विभागामार्फत डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत. ज्यादा दराने आलेल्या निविदांमुळे कोट्यावधी रुपयांचा आर्थिक ‘भुर्दंड’ महापालिकेला सोसावा लागणार आहे. निवीदा ज्यादा दराने आल्याने अशा कामांमध्ये संबधित अधिकारी व ठेकेदार संगनमताने निविदाप्रक्रिया राबवित असल्याचा संशय येतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने या दोन्ही कामाच्या निविदा रद्द कराव्यात. या कामांची फेरनिविदा करून नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी. त्याच संबधित स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी, अशी मागणी कामठे यांनी केली आहे.