खासदार ए.टी.पाटलांच्या पाठपुराव्याला आले यश
भुसावळ- वाराणसी व देवळाली स्थानकावर रेल्वेची विकासकामे सुरू असल्याने काही गाड्यांच्या फेर्या रद्द करण्यात आल्याने चाकरमाने, कर्मचारी, व व्यावसायीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. डाऊन मार्गावरील काही गाड्यांना पाचोरा, चाळीसगाव व जळगाव स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी खासदार ए.टी.पाटील यांनी डीआरएम आर.के.यादव यांची भेट घेवून मागणी केली होती तसेच वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता. रेल्वे प्रशासनाने मागणीची दखल घेत 5 जुलैपासून 25 जुलैपर्यंत डाऊन 12542 एलटीटी-गोरखूपर एक्स्प्रेसला पाचोर्यासह जळगाव येथे तात्पुरता थांबा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. सायंकाळची कामायनी एक्स्प्रेस सुरू होईपर्यंत हा थांबा असणार आहे.