डायबेटीससाठी जडीबुटी देण्याच्या नावाखाली मुंबईतील पाच जणांना लुटले

0

32 तोळे सोन्यासह 52 हजारांची रक्कम लंपास

मुक्ताईनगर : मुंबई येथील पाच जणांना तालुक्यातील चारठाणा मधापुरी भागातील जंगलात नेत मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मुक्ताईनगर तालुक्यात यापूर्वी नागमणी, मांडूळ देण्याच्या आमिषाने अनेकांना ठगविण्याच्या घटना ताज्या असतानही आता आजारावरच औषधी देण्याच्या नावाखाली लुटण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

जंगलात नेवून मुंबईकरांना लुटले
सूत्रांच्या माहितीनुसार, डायबेटीससाठी काळी हळद आणि जडीबुटी देण्याच्या नावाखाली पवार नामक व्यक्तीने मुंबई येथील जटाशंकर गौड (53, रा.गोरेगाव मुंबई,) नागेंद्रप्रसाद ठिवर (52, रा.नालासोपारा, ईस्ट, जि.पालघर), भरत परमार (50, रा.कांदिवली वेस्ट, मुंबई), दीपक परमार (50, रा.मालाड ईस्ट, मुंबई) व अतुल मिश्रा (35, रा.गोरेगाव, मुंबई) यांना मुक्ताईनगरात बोलावले संबंधित मंगळवारी मुक्ताईनगरात आल्यानंतर रक्षा पेट्रोल पंपाजवळ हा संशयास्पद इसमाने पाचही जणांना चारठाणा मधापुरी परीरात नेत एका झोपडी वजा खोलीत बसविले व याचवेळी त्यांच्याच टोळीतील 10 ते 15 जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही इसमांच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घायला आल्याचा बनाव बनाव करीत त्यांच्या टोळीतील पवार यास मारण्याचे नाटक केले आणि पाचही मुंबईकराना बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सोने, रोकड आणि मोबाइल हिसकावून पोबारा केला. यात जटाशंकर गौड याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या असा तब्बल 32 तोळे सोने, 52 हजार रोख आणि मोबाइल या लुटमारीत टोळीने पळवून नेले. दरम्यान, पवार नामक इसमाने लुटमार झालेल्या पीडितांना तुम्ही येथून निघून जा, नाहीतर पोलिस तुम्हालाच पकडतील, असा आव आणत मदत म्हणून या पीडिताना पाच हजार देत पळ काढला.