डायरियाने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

0

जळगाव – गेल्या आठवड्यापासून उलट्यामुळे चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. अत्यंत हालाकीची परिस्थित असल्याने वेळीच उपचार न मिळल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणत असतांना तिचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान जिल्हा वैद्यकिय अधिकारी व मयत चिमुकलीच्या नातेवाईकांचा शवविच्छेदनावरून वाद निर्माण झाला होता. माया सिकंदर भिल (वय-4) रा. वाघोद ता. यावल असे मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आठवड्यापासून माया भिल या चिमुकलीस डायरियाची लागण झाली होती. त्यामुळे तिला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उलट्या आणि लूझमोशेन होत होते. मात्र हालाखीची परिस्थिती असल्याने वेळीत उपचार मिळाला नाही. आज सकाळपासून तीला अत्यवस्त वाटत असल्याने नातेवाईकांनी जिल्हारूग्णालयात दाखल करण्यासाठी येत असतांना वाटेतच सोमवारी सकाळी 10 वाजता चिमुकलीचा मृत्यू झाला.