भुसावळ । तालुक्यातील साकेगावजवळील सिंगार बर्डी भागात जय बजरंग दुर्गा मंडळाच्या पाठीमागे जुगाराचा डाव सुरू असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने कारवाई करीत आठ जणांना अटक केली तर 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ईआरटी पथकातील हवालदार राजेंद्र साळुखे, नाईक बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहील तडवी, प्रेमचंद सपकाळे, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, सोपान पाटील, राहुल चौधरी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे आदींना अटक केली.
या आरोपींना अटक
सईद बाबुलाल पटेल, नारायण पुना भोई, महेंद्र भागवत कुंभार, बापू रामराव पाथरवट, प्रदीप प्रकाश ठाकरे, उत्तम भीमराव कोळी, विलास शांताराम धनगर, देवानंद सुरेश वाघ (साकेगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 16 हजारांची रोकड, पाच हजार 500 रुपयांचा मोबाईल, पत्ता जुगाराची साधने जप्त करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.