जळगाव । शहरातील राजकल चौकात उभ्या असलेल्या मोटारसायकलची डिक्की फोडून 1 लाख 80 हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी विकास राजू गुमारे उर्फ हाड्या व बल्लू अरूण दहेकर उर्फ टार्जन यांना अटक करून आज मंगळवारी न्या. एस.बी.देवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 23 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शेख अश्फाक शेख कमलाद्दीन यांच्या मोटारसायकल क्रं. एमएच. 19.बी.डी.4189 ही 4 ऑक्टोंबर 2016 रोजी शहरातील राजकमल चौकात उभी होती. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या मोटारसायकलची डिक्की फोडून 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी शहर पोलिसांच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले विकास राजू गुमारे उर्फ हाड्या व बल्लू अरूण दहेकर उर्फ टार्जन (वय-30) दोन्ही रा. कंजरवाडा यांना आज मंगळवारी न्यायालयाचे आदेशाने अटक केली. यानंतर दुपारी त्यांना डिक्की फोडल्याप्रकरणी न्या. एस.बी.देवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. देवरे यांनी संशयित हाड्या आणि टार्झन यांना 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्ररकणी सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी तर आरोपीपक्षातर्फे अॅड. केदार भुसारी यांनी कामकाज पाहिले.