डिजीटल क्रांतीतून घडावा सशक्त समाज

0

भुसावळ (प्रतिनिधी) – सुविधा, मागणीनुसार सेवा आणि अधिकार या तीन क्षेत्रावर आधारीत डिजीटल इंडियाचे व्हीजन आहे. अर्थव्यवस्थेचे ज्ञान, पारदर्शकता व ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले करून देण्याचे काम ई-क्रांतीने केले आहे. या डिजीटल क्रांतीतून सशक्त समाज घडावा, असा आशावाद द.शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी येथे व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
भुसावळ कला, विज्ञान व पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजना +2 तर्फे विशेष हिवाळी शिबीरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. श्याम दुसाने तर प्रमुख उपस्थिती महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी गुजर, प्रा. ए.बी. पालवे, प्रा.डॉ. कुंदा चौधरी, प्रा. निलीमा पाटील, प्रा. शिरीष नारखेडे यांची होती. प्रारंभी नयना मेघे हिने स्वागतगीत म्हणून मान्यवरांचा परिचय करून दिला. कमलाकर सोनवणे याने प्रास्ताविक केले.

संस्कृतीचा विसर पडू देवू नका
डॉ. जगदीश पाटील यांनी डिजीटल इंडिया या विषयावर बोलतांना सांगितले की, सर्वच क्षेत्रात वाढता डिजीटलचा वापर सर्वसामान्यांसाठी सुविधा पुरविणारा आहे. डिजीटलतेतून आधुनिकतेकडे जात असतांना भारतीय संस्कृतीचा विसर पडू देवू नका. ज्ञानेंद्रियांचा गैरवापर टाळा, आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासासह समाजासाठी जगणे शिका, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्रा.श्याम दुसाने यांनी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केल. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी चौधरी हिने तर आभार हिमांशू बोरोले याने मानले.

50 विद्यार्थ्यांचा सहभाग
शिबीराच्या पहिल्या दिवशी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. रासेयोमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच प्रिती पाटील, उपप्राचार्य प्रा. एम.आर. संदानशिव, पर्यवेक्षक प्रा. एस.बी. पाटील, प्रा. आर.एस. पाटील, प्रा. बी.डी. चौधरी, प्रा. यु.बी. नंदाणे आदी उपस्थित होते. रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. आर.एस. पाटील यांनी शिबीराच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. सरपंच प्रिती पाटील यांनी जनजागृतीचे आवाहन केले. रासेयो शिबीरास 50 विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबिरात प्रा. निलेश गुरूचल, गुणवंत महाजन, संजीव पाटील, प्रा. एस.बी. परदेशी यांची व्याख्याने होणार आहेत. शिबीरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे, प्रा. एस.एम. दुसाने, प्रा. एम.आर.गुजर, प्रा. ए.बी. पालवे, प्रा.डॉ. के.एम. चौधरी, प्रा. एन.वाय. पाटील, प्रा. एस.आर. नारखेडे यांनी कळविले आहे.