शेंदुर्णी । येथील गरूड महाविद्यालयात येथे ‘डिजीटल इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत महाविद्यालयास प्राध्यापकांच्यावतीने व्हर्च्युअल किंवा डिजीटल क्लासरूम करिता प्रोजेक्टर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस समर्पित करण्यात आले. उद्घाटन स्नेहदिप गरूड यांनी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केले. या प्रोेजेक्टर कम कॉम्प्युटर या ‘स्क्रीन टच’ यमाचे प्रशिक्षण ज्ञानेश्वर शिसोदे, क्षेत्रिय व्यवस्थापक नासिक यांनी दिले. या यंत्राच्या सहाय्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम महाविद्यालयात राबविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण देण्यात आले.
महाविद्यालय खडू-फळा मुक्त होणार : या यंत्रामुळे आता महाविद्यालय खडू-फळा मुक्त होणार असून स्क्रीन टच सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकविता येणार आहे. तसेच इंटरनेट किंवा वाय-फायच्या मदतीने व्हीडीओ कॉन्फरसिंग यासह इतर आवश्यक माहिती विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचविता येणार आहे. याबरोबरच हि माहिती भविष्यकालिन उपयोगाकरिता साठवून ठेवता येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांच्या स्वप्नातली संकल्पना आज प्रत्यक्षात महाविद्यालयात साकारली, सन 2018 पर्यंत संपूर्ण महाविद्यालय खडू- फळा मुक्त आणि पुर्णपणे व्हर्च्यअल क्लासरूम साकारण्याच्या दृष्टीने प्राचार्य हे आपल्या प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू- भगिनींसह प्रयत्नशिल राहणार आहेत.