डिजीटल युगात गावोगावी जावून जादू दाखवावी लागत आहे

0

नवापूर। जादु हा चमत्कार नसुन हातचालाखी आहे. लोकांनी त्याकडे मंनोरजन म्हणुन बघावे.या जगात चमत्कार हा प्रकार नाही,लोकांनी बाबा बुआ यांचा हातचलाखीला बळी न पडता स्वतःची फसवणुक करुन घेऊ नये असे स्पष्ट प्रतिपादन जादुगर सिंकदर नागपुरवाले यांनी केले. नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कुल गणेश मंडळात जादु दाखविण्यासाठी सिंकदर नागपुरवाले व मेहमानखान नागपुरवाले आले होते. त्यांनी विविध जादु ,हास्य विनोद करुन विद्यार्थाना मंत्रमुग्ध व आश्चर्यचकीत केले. विविध प्रकारचे जादु प्रकार त्यांनी विद्यार्थाना करुन दाखवले.

अंधश्रद्धेला बळी पडू नका
विद्यार्थ्यांनी जादु पाहुन जादुगरला आपल्या जवळील खाऊचे पैसे दिले. शिक्षकांनी ही आर्थिक बक्षीस दिले. यावेळी सिंकदर नागपुरवाले यांनी जनशक्तीशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले की जादु हे फक्त एक नाव आहे. जगात चमत्कार नाही. फक्त हातचलाखीची कला आहे. हातचालाखी करुन काही संधीसाधु लोक चमत्कार असल्याचे भासवुन फसवणुक करत आहे. अंधश्रध्देला बळी पडतात व काही लोकांनी चमत्काराचा नावाखाली जादुला बदनाम केल्याची खंत वाटते. दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहीए।

मुलांना जादू शिवणार नाही
आताचा डिजीटल जमान्यात जादु लुप्त होत चालली असुन आम्हाला आज जादु दाखविण्यासाठी गावोगावी फिरावे लागत आहे. आता कसे तरी आपला संस्काराचा गाडा चालवत आहोत. आम्ही ही जादु शिकलो. जादु व्यवसायात आयुष्य चाललय आहे पण आमचा मुलांना जादु शिकवणार नाही. त्यांना चांगले शिकवुन शिक्षणाचा जादुगर बनविणार आहोत. आतापर्यत भैरव जादुगर,छोटे सरकार यांना भेटलो असुन त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुनील भावसार यांचा महल ही आपण पाहीला असल्याचे त्यांनी सांगितले.

जादुच्या व्यवसायात सातवी पिढी
जादुचा आड लपवुन कोणाची फसवणुक केली नाही. लोकांचे मंनोरजन व हास्य व त्यातुन पोटासाठी दोन पैसे यातच समाधान वाटते. आम्ही नागपुरकडचे असून जादुगर व्यवसायात आमची ही त्यांची सातवी पिढी असल्याचे सांगितले. वाढदिवस,लग्न,विविध कार्यक्रमात जाऊन आम्ही जादुचेप्रकार दाखवतो. याव्यवसायात लोक कमी पैसे देतात. काही कौतुक तर कोणी आमची टिंगल ही करतात. मी व माझा गरिबीचा परिस्थिमुळे सातवीपयर्ंत शिकलो नंतर वडिलांकडुन मी जादु शिकुन अनेक शहरात जादु दाखवुन पैसे कमवतो आहे.