जळगाव। भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परिक्षा फी योजना व इतर योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील डिबीटी पोर्टल राबविण्यात येणार आहे. याबाबत महाविद्यालयांसाठी एम. जे. महाविद्यालय येथे 3 ऑगस्ट रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी दिली आहे.
हे प्रशिक्षण 2 सत्रात आयोजित करण्यात आले असून यासाठी महाविदयालयाचे प्राचार्य, तसेच शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे लिपीक यांनी उपस्थित रहावे. प्रशिक्षणाचे पहिले सत्र सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार असून यावेळी मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, चोपडा, जामनेर, रावेर, बोदवड या तालुक्यांतील महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कामकाज पाहणारे लिपिक यांनी तर दुसरे सत्र दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे. यावेळी जळगाव, एरंडोल, पारोळा, अंमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव या तालुक्यांतील महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कामकाज पाहणारे लिपिक यांनी उपस्थित रहावे.