डीएसकेच्या मालमत्तांचा लिलाव

0

पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा आता लिलाव होणार आहे.

कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे. लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे.