डीएसके यांच्या मुलाच्या कोठडीत वाढ

0

पुणे-बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याला ५ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांच्यासह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरीष यांच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जून रोजी सायंकाळी स्वत:हून कोर्टापुढे हजर झाले. त्यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. शिरीष यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाने शिरीष यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर होण्याचे आदेश दिले होते.