डीपीडीसीवर वाल्मीक पाटील यांची नियुक्ती

जळगांव- जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ उपाध्यक्ष वाल्मिक पाटिल यांची नियुक्ती शासनातर्फे कऱण्यात आली. तशा आशयाचे शासनाचे पत्र त्यांना प्राप्त झाले. वाल्मिक पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्यामुळे त्यांचे सर्वं स्तरातून अभिनंदन होत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतिष पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.