जळगाव- शहरातील डीमार्ट मॉलच्या पार्किंगमधून दामोदर कोंडीबा धारकर (रा़ शिवकॉलनी) यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकॉलनी येथील दामोदर धारकर हे रविवार, १९ आॅगस्ट रोजी दुपारी १२़३० वाजता डीमार्ट मॉलमध्ये दुचाकीने (क्र.एमएच.१९़एसी.७३७८) खरेदीसाठी आले होते. त्यांनी दुचाकी ही मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दरम्यान, अर्धा तासानंतर दुपारी १ वाजता खरेदी करून बाहेर आल्यावर त्यांना पार्किंगधून त्यांची दुचाकी चोरीला गेल्याची दिसून आली. अखेर याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.