डीवायएसपीसह जिल्ह्यातील चौघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0

शहर पोलीस ठाण्याचे संजय शेलार यांचा समावेश; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

जळगाव – महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी कर्मचारी अशा 800 जणांना मंगळवारी पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व 2 पोलीस हेडकॉन्स्टेबल अशा चार जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानितक करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक सु.कु. जायसवाल यांनी पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या कर्मचार्‍यांबाबतचे आदेश काढले. यात जिल्ह्यातील तसेच शहरातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये  पोलीस उपअधिक्षक गजानन तुळशीराम राठोड (जळगाव), पोलिस उपनिरीक्षक युवराज मोतीराम पाटील (जळगाव), पोलिस हवलदार देवेंद्र मोतीराम दाणीर व संजय एकनाथ शेलार यांचा समावेश आहे.

संजय शेलार यांना 224 रिवॉर्ड 

संजय शेलार यांनी खामगाव शहर, पारोळा, जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा अशी 22 वर्षांची सेवा बजावली आहे. ते सध्या जळगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहे. यात त्यांनी सतत 15 वर्षे उत्तम कामगिरी बजावली असून याबद्दल त्यांना 224 रिवॉर्ड मिळाले आहेत. या कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालकपदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी पालकमंत्री यांच्याहस्ते त्यांना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.