डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती रॅली

0

चिंचवड – प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज मलेरिया डेंगू आणि साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. यारॅलीमध्ये वाल्हेकरवाडीमधील प्रेरणा शाळेचा उस्फूर्त सहभाग होता. यात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. आले. प्रभागातील रहिवाशी कॉलन्यांमधून रॅली ‘स्वच्छता पाळा, रोगराई टाळा’, ‘डंख छोटा, धोका मोठा’ अशा जनजागृतीपर घोषणा देत रॅली पुढे जात होती. यावेळी नगरसेविका करुणा चिंचवडे व मलेरिया निर्मूलन पथकाचे कर्मचारी घरोघरी प्रबोधनात्मक पत्रके वाटत होते. प्रेरणा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मलेरिया निर्मूलनाच्या सुकटे मॅडम व मलेरिया निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.