डेंझिल चौकातील रेल्वेच्या भिंतीला स्थानिक रहिवाशांचा विरोध

0

भुसावळ । रेल्वे फिल्टर हाऊस भागातील रेल्वे परीसरात रेल्वे प्रशासनातर्फे भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने त्यास या भागातील रहिवाशांनी विरोध केला आहे. ही भिंत उभारल्यास इंजिन घाटाकडे जाण्याचा रस्ता बंद होवून रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या भागातील नागरीकांनी खासदार रक्षा खडसे यांना साकडे घालत तिढा सोडवण्याची मागणी केली होती. खडसे यांनी मंगळवारी डीआरएम आर.के.यादव यांची भेट घेत समस्या मांडली तर हा रस्ता रेल्वेचा नव्हे तर पालिका प्रशासनाच्या मालकीचा व डीपी रोड असल्याने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यादव यांनी कागदपत्रे पाहून सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रसंगी आश्‍वासन दिले.

भिंत रेल्वेची, गैरसोय नागरीकांची
रेल्वे कॉलन्यांमध्ये होणार्‍या चोर्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासन भिंत उभारत आहे मात्र ही भिंत उभारली गेल्यास डेंझिल चौक तसेच कवाडे नगरासह अन्य भागातील लोकांना वळसा घालून जावे लागणार असल्याने त्यांची गैरसोय होणार असल्याचे नागरीकांनी खडसे यांना पटवून दिले. खासदार रक्षा खडसे यांनी डीआरएम आर.के.यादव यांची भेट घेत डीपी प्लॅनचा रस्ता आहे, नागरीकांची गैरसोय होईल, असे सांगितल्यानंतर यादव यांनी लवकरच अधिकार्‍यांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रसंगी आश्‍वासन दिले.

कुली असोसिएशनचे खासदार खडसेंना साकडे
भुसावळात आलेल्या खासदार रक्षा खडसे यांना रेल्वे कुली असोसिएशनने चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून रेल्वे सेवेत सहभागी करण्यासंदर्भात साकडे घातले. अमीद जुम्मा गवळी, जगदीश, इमान, शेख रफीक, रफीक गवळी, विष्णू सोनवणे, जितू जाधव, हेमंत, कयुम, राजेश पाटील, नामदेव, रज्जाक, विजू कोळे, लुकमान आदी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, प्रा.सुनील नेवे, किरण कोलते, बापू महाजन, निकी बत्रा, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, सविता मकासरे,सचिन सपकाळे, देवा वाणी, परीक्षीत बर्‍हाटे, राजेंद्र नाटकर, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रमाशंकर दुबे तसेच मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.