डेअरीत चोर शिरल्याची अफवा अन् पोलिसांना फुटला घाम

0

भुसावळातील प्रकार ; खोदा चुछां, निकला पहाडचा अनुभव

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा डेअरीच्या वरच्या मजल्यावरील निवासस्थानात चोर शिरल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र घर मालकाच्या हातूनच बाहेर जातांना घराचा दरवाजा आतून बंद झाल्याने चोर शिरल्याची माहिती अफवा ठरली. या प्रकारामुळे पोलिसांसह रहिवाशांना चांगलाच घाम सुटला. नितीन धांडे यांच्या घरात चोर असल्याची अफवा वार्‍यासारखी पसरताच परीसरातील अनेकांनी अष्टभुजा डेअरीजवळ गर्दी केली. यावेळी बंद घराचा दरवाजा उघडून घरात शोध घेतला असता घरात कुणीही आढळून आले नाही. नुकतेच काही दिवसापुर्वी अष्टभुजा डेअरीमध्ये चोरट्यांनी चोरी करून हातसफाई केली होती मात्र पोलिसांना त्यानंतरही चोरट्यांचा शोध घेण्यात यश आले नसताना गुरुवारी पुन्हा चोर शिरल्याची वार्ता कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.