कडक कारवाईची चाळीसगाव पर्यावरणप्रेमींची मागणी
चाळीसगाव । डेरेदार झाडांची कत्तल करुन 16 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी 8 वाजता सुमारास हिरापूर रोडने कळमनाल्याजवळ चाळीसगावकडे भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, ज्ञानेश्वर राठोड, किशोर राठोड यांनी पाहिले व त्यांनी लागलीच चाळीसगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी संजय मोरे यांना फोन करुन माहीती दिली व सदर ट्रॅक्टरचा 9 किलामीटर पाठलाग करत नवीन नाक्याजवळ वनविभागाचे प्रकाश पाटील व त्यांचे सोबत असलेल्या वनकर्मचारी यांचे ताब्यात दिला. व सदर ट्रॅक्टर वनविभागाच्या कार्यालयात लावला असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यावरण रक्षणासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी यासाठी आवाहन करत असतात. तरी देखील रोज शेकडो डेरेदार वृक्षांची कत्तल होतांना दिसते. या प्रकारात काही वखारीही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळेस चोरीने डेरेदार झाडांची कत्तल केलेले लाकडांचे ट्रॅक्टर दुधसागर मार्गे रेल्वे पुलाखालून भरधाव वेगाने रोजच वखारींकडे नेले जातांना दिसतात. मागच्या आठवड्यातही सदर ट्रॅक्टर रेल्वे पुलाखालून जात असतांना जास्तीची लाकडे असल्यामुळे पुलात अडकले होते परंतू कसेबसे काढत पेट्रोल पंपाकडून नारायणवाडी मार्गे वखारीकडे भरदाव वेगाने नेतांना अनेकांनी पाहिले होते. यामुळे सदर झाडांची सर्रास कत्तल करणा-यांचे फावत आहे. एकीकडे शासन पर्यावरण सप्ताह पाळून कोट्यावधी रोप लावण्याचा दावा करत आहे. झाडे लावा झाडे जगवा सांगत आहे.आणि दुसरीकडे दररोज शेकडो डेरेदार झाडांची कत्तल होत आहे. गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभागाने लक्ष द्यावे व सदर प्रकार थांबवण्यासाठी वृक्षतोड करणार्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाचे सोमनाथ माळी व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.