डेल्टा फोर्सचा जवान जखमी

0
लोणावळा : पंक्चर झालेल्या वाहनाला मदत करताना मागून आलेल्या ट्रकने ठोकर दिल्यामुळे डेल्टा फोर्सचा एक जवान गंभीर जखमी झाला. ही घटना आज पहाटे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कि.मी.34.500 वर खालापूर ते पनवेलच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लेनवर घडली. मुसळे (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे या जवानाचे नाव असून त्यांना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला मर लागला असून अति रक्तस्त्राव झाला आहे. सुदैवाने या घटनेत या ठिकाणी उभी असलेली आयआरबीची टीम थोडक्यात बचावली. या घटनेत दोन ट्रक चालक देखील जखमी झाले आहेत.